पंढरपूरात युवकावर खूनी हल्ला .

पंढरपूर:- शहरातील रेल्वे ग्राउंडजवळ रविवारी ५ वाजण्याच्या दरम्यान एका युवकावर कोयत्याने वार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
पिनू ठाकरे या युवकाच्या पाठीवर , हातावर कोयत्याने वार केले आहेत. पिनू ठाकरे याचा हॉटेल नागालँड जवळ वेल्डींगचा व्यवसाय आहे . अंर्तगत वादातून गेली दोन दिवस हे प्रकरण धूमसत असल्याचे समजते. नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येनंतर शांत झालेल्या पंढरपूर मध्ये पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीने डोक वर काढल्याचे दिसत आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभू आणि पोलिस उप अधिक्षक निखिल पिंगळे या दोन अधिकाऱ्यांची बदली झाल्याच्या चर्चेने गुन्हेगारांनी डोक वर काढल्याचे बोलले हात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen + 7 =

error: Content is protected !!