उपजिल्हा रुग्णालयात चमको पुढाऱ्यांची अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी.

पंढरपूर :- येथिल उप जिल्हा रुग्णालयात स्वंयघोषीत चमको पुढाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण दमदाटी केल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, आज शुक्रवारी ४ वाजणेच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. ढवळे यांनी आषाढी यात्रा नियोजनाची बैठक आयोजित केली होती. यावेळी काही स्वयंघोषीत समाजसेवक तेथे आले. त्यांनी सिनेस्टाईल खूर्ची टाकून कर्तव्य बजावणाऱ्या सिस्टरला दमदाटी सुरु केली. मोठे अधिकारी असल्यासारखे तुम्ही कामं निट करत नाही, मला ओळखले नाही का ? अशी दमदाटी केली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिक्षकांना बोलावून घेतले. त्यांनी विचारणा केली असता त्यांनाही आरेरावी केली. डॉ. ढवळे यांनी पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिल्यावर या चमकोंनी पळ काढला. अशा स्वंयभू पुढाऱ्यांचा “सागर” वाढत आहे. एका प्रादेशिक पक्षाचे पदाधिकारी असल्याचे सांगून हे लोक शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत फिरत असल्याची चर्चा रुग्णालयात दबक्या आवाजात सुरु आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईची मागणी होत आहे.
अधिक माहिती घेतली असता हे मनसेचे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सांगितले होते. मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मात्र हात वर केले असून त्यांनी पक्षातून काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत डॉ. ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता , उपजिल्हा रुग्णालयात काम करणे अवघड झाले आहे. कोणीही येवून दम देत असल्याने कर्मचारी भयभीत झाले आहेत. आपण याबद्दल पोलिसात तक्रार देणार असल्याचे त्यांनी संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − eight =

error: Content is protected !!