मंदीर समितीच्या वतीने शहरात ४ ठिकाणी वॉटर एटीएम . एक रुपया लिटर दराने मिळणार मिनरल वॉटर

पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने शहरात ४ ठिकाणी वॉटर एटीएम उभारण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली . यामाध्यमातून भाविकांबरोबर पंढरपूरकरांना देखील १२ महिने स्वच्छ आणि निर्मळ असे मिनरल वॉटर मिळणार आहे.
गत वर्षी आषाढी यात्रेवेळी नियुक्त झालेल्या मंदीर समितीने मंदीर परिसर , प्रदक्षिणा मार्ग स्वच्छते बरोबरच आता भाविकांसह पंढरीवासीयांना देखील मिनरल वॉटर देण्याचा निर्णय घेतला आहे. एक रुपया प्रति लिटरने हे मिनरल वॉटर उपलब्ध होणार आहे. यासाठी समितीच्या वतीने अंदाजे २४ लाख रुपये खर्च होणार आहेत.

शहरातील महात्मा फुले चौक , काळा मारुती चौक , राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान आणि महाव्दार पोलीस चौकी जवळ हे वॉटर एटीएम उभे केले जाणार आहेत. यापैकी महात्मा फुले चौक आणि काळा मारुती चौकातील वॉटर एटीएम यात्रेपूर्वी सुरु केली जाणार आहेत. मंदीर समितीच्या वतीने हे केंद्र चालवण्यात येणार आहे.
शहरात दररोज हजारो भाविक येतात. पिण्याच्या पाण्यासाठी ते मिनरल वॉटरला प्राधान्य देतात. १ लिटरची बाटली २० रुपयांना भाविकांच्या पदरात पडते. मंदीर समितीच्या या कायमस्वरूपी वॉटर एटीएम मुळे भाविकांची उत्तम सोया झाली आहे.
शहरात दूषित पाणीपुरवठा होतो की कायमची ओरड आहे. सध्या शहरवासीय खासगी कॅन मधून २ रुपये लिटरने पाणी विकत घेतात. मंदीर समितीच्या या वॉटर एटीएम मुळे पंढरपूरकरांना स्वतात मिनरल वॉटर मिळणार आहे. मात्र खासगी पाणी विक्रेत्यांना चाप बसणार आहे. समितीच्या या निर्णयाचे शहरावासीयांसोबत भाविकांमधून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × two =

error: Content is protected !!