स्विकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर. “हे” आहेत स्पर्धेत.

पंढरपूर :- नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज दाखल करता येणार आहे. तर ७ सप्टेंबर रोजी स्विकृत नगरसेवकांच्या निवडी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षखाली होणार आहे.
परिचारक गटाचे दोन तर भाजपच्या एका नगरसेवकाने आपला राजीनामा दिल्याने आता नव्या निवडी होणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून संधी देण्यात येणार आहे.
परिचारक गटाकडून श्रीनिवास बोरगावकर या युवा चेहऱ्याला संधी देवून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देणार असल्याची सुत्राकडून मिळाली आहे. मराठा समाजाचा संतपेठेतील तरुण चेहरा मालोजी शेंबडेला नगरपालिकेत स्थान देण्यात येणार आहे. तिसऱ्या जागेसाठी दलित आणि मुस्लिम समाजात रस्सीखेच आहे. इसबावी आणि उपनगरात २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत आमदार प्रशांत परिचारकांना कमी मतदान झाले होते. त्यामुळे येथिल सर्वसमावेशक चेहरा म्हणून सनी मुजावरला संधी देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे परिचारक गटाकडे मातंग समाजाचा प्रतिनिधी नसल्याने माजी उपनगराध्यक्ष दयानंद वायदंडेला आयत्यावेळी उमेदवारी दिली जावू शकते. तसेच कालिकादेवी चौकातून जुबेर तांबोळी यांनी देखिल मागणी केल्याने मुस्लिम समाजात चुरस वाढली आहे.
श्रीनिवास बोरगावकर, मालोजी शेंबडे यांच्या जोडीला तिसरा उमेदवार म्हणून आता सनी मुजावर , जुबेर तांबोळी आणि दयानंद वायदंडे या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते हे ६ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!