पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मुलाचे निधन .

पंढरपूर :- पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांचा चिरंजीव संकेत किशोर नावंदे(वय-२८)यांचे अल्पशा आजाराने २९ ऑगस्ट रोजी दुखद निधन झाले. डेंग्यू सदृश्य आजाराच्या पुढील उपचारासाठी पुण्याला घेवून जात असताना वाटेतच संकेतचा मृत्यू झाला.
संकेत नावंदे यांना डेंग्यू सदृश्य आजार झाला होता. नांदेड येथे त्यांचावर उपचार करण्यात येत होते. पुढील उपचारासाठी पुणे येथे घेवून जात असताना भिगवण जवळ त्यांची प्राणज्योत मालवली. संकेत नावंदे हे बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये सेवेत होते. १ जुलै रोजी त्यांचा विवाह झाला होता.
पोलिस निरीक्षक किशोर नावंदे हे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पुणे शहर फरासखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत.
संकेत नावंदे यांच्यावर नांदेड येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!