बस पलटी होवून झालेल्या अपघातात तीन चिमुकल्यांचा मृत्यू.

पंढरपूर :- बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर वांगरवाडी शिवारात(ता.बार्शी) मुखेड वरुन मुंबई कडे प्रवाशी घेऊन चाललेल्या गझल (mh04-gp-5151)ही लक्झरी बस पलटी होऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. रविवारी दि.18 च्या रात्री साडे बारा च्या सुमारास भिषण अपघात झाला.15 हून अधिक जण गंभीर जखमी अवस्थेत,कुणाचे पाय तर कुणाचं हात तुटले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बार्शीतील रुग्णालयात जखमींवर उपचार केले जात आहेत. बसचालक दारुच्या नशेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
या अपघातात आर्वी मोहन देवकते (वय १८ महिने रा.विदंगी खुर्द ता.अहमदपुर जि लातुर) फैज इस्माईल पठाण (वय तीन वर्ष रा.दामुननगर आदिवली मुंबई) धनश्री ज्ञानेश्वर मुकनर (वय 12 वर्ष मुलगी रा.हिप्परगा(शहा) ता.कंदार जि.नांदेड) यांचा मृत्यू झाला आहे.

error: Content is protected !!