उध्दव ठाकरेंचे पंढरीत आगमन. श्री विठ्ठलाचे घेतले दर्शन .

पंढरपूर :- पहेले मंदिर फिर सरकार या नव्या घोषणेसह राज्या होणाऱ्या पहिल्या महासभेसाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे सह कुटुंब पंढरी दाखल झाले. पंढरीत पाऊल ठेवल्यानंतर पहिल्यांदा ठाकरे कुटुंबाने श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , पत्नी सौ. रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते.
सोलापूरहून आगमन झाल्यानंतर पंढरपूर विश्रामगृहात उध्दव ठाकरे येणार होते. मात्र हेलीपॅड वरुन त्यांनी थेट मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. पहेले मंदिर फिर सरकारच्या अगोदर विठ्ठलाला साकडे घातले. मंदिर परिसराता वारकऱ्यांना दोन्ही हात उंचावून ठाकरेंनी अभिवादन केले.
यावेळी आमदार तानाजी सावंत हे उपस्थित होते.


विश्रामगृहात केंद्रीय मंत्री अनंत तरे , खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार राहुल शेवाळे , मंत्री दिवाकर रावते , रविंद्र वायकर , खासदार अरविंद सावंत , अतुल राजुरकर यांच्यासह सेना पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार भारत भालकेंनी केले स्वागत.
पंढरपूरचे कॉंग्रेस आमदार भारत नाना भालकेंनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेवून त्यांचा स्वागत आणि सत्कार केला. यावेळी ठाकरेंनी भालकेंची आवर्जून विचारपूस केली . आमदार भालके तुम्ही आम्हाला विसरले का ? असा मिस्किल सवाल त्यांनी केला.

error: Content is protected !!