दलित , मुस्लिम , ओबीसी प्रतिनिधींची विषय समित्यांवर निवड . अखेर “जातीवरच” झाल्या निवडी .

पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी सोलापूर डेलीने दिलेल्या वृत्तानुसार “जातीवर” झाल्याचे सिध्द झाले. दलित चेहरा म्हणून नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड यांना बांधकाम समिती सभापती, तर दुसरा दलित चेहरा सौ. भाग्यश्री शिंदे यांना शिक्षण समिती सभापती तर मुस्लिम चेहरा म्हणून कट्टर परिचारक समर्थक नगरसेविका सौ. रेहाना बोहरी पाणीपुरवठा , ओबीसी प्रतिनिधी म्हणून आरोग्य समिती सभापती अक्षय गंगेकर आणि महिला बालकल्याण सभापती शकुंतला नडगिरे यांच्या निवडी झाल्यात. या निवडींकडे नजर टाकल्यास फक्त “जात” हा निकष डोळ्यासमोर ठेवल्याचे स्पष्ट होते.
स्थायी समिती सदस्य पदी माजी नगराध्यक्ष दगडु धोत्रे , जेष्ठ नगरसेवक वामन बंदपट्टे आणि नगरसेविका करुणा आंबरे यांची नियुक्ती करण्यात आली.
उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी राजीनामा न दिल्याने उपनगराध्यक्ष पद काही काळानंतर निवडले जाणार आहे. वरील निवडी पहाता मलपेंना मुदतवाढ मिळु शकते असे बोलले जात आहे .

विषय समित्यांच्या निवडी चालल्या “जातीवर”. विधानसभेला परिचारक कुटुंबातील कोण ? जात की विकास ? वाचा सविस्तर

विषय समित्यांच्या निवडी चालल्या “जातीवर”.

परिचारकांनी विधानसभा २०१९ ची तयारी सुरु केल्याचे या नियुक्त्यावरुन स्पष्ट होत आहे. ज्या “जातींच्या” जिवावर गेली ३० वर्ष राजकारण केले त्याच दलित , मुस्लिम आणि ओबीसी समाजाला पुन्हा गोंजारण्याचे काम परिचारकांनी केलय. आता विधानसभेचा उमेदवार फायनल करण्याचे मोठे आव्हान परिचारकांच्या पुढे आहे.
यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून प्रातांधिकारी सचिन ढोले , मुख्याधिकारी अभिजीत बापट , उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर आदी उपस्थित होते .

error: Content is protected !!