प्रेमीयुगलांचा “संगम” करणाऱ्या लॉजवर पोलिसांची रेड.

पंढरपूर :- तीर्थक्षेत्र पंढरी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या लॉजवर पोलिसांनी रेड केलीय . प्रेमीयुगलांचा “संगम” करणाऱ्या या लॉजवर चार जोडपी सापडल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. या लॉजवर वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार ही रेड करण्यात आलीय. यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती सापडल्याचे समजते. आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी ही रेड केली असली तरी रात्री ११ वाजेपर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असल्याचे तालुका पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत होते. दरम्यान “ते” लॉज सिल केल्याचे समजते .

error: Content is protected !!