पवार साहेबांनी आमचं ऐकायचे आणि माढ्यातूनच उभे राहायचे- खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची मागणी .

पंढरपूर :- पक्षातील वरिष्ठांनी आपल्याला विनंती केलीय . त्यानुसार आपण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनी केलीय. ते सांगोल्यात आयोजित दुष्काळी परिषदे बोलत होते . या परिषदे फक्त शरद पवारांच्या माढा लोकसभेच्या उमेदवारीचीच चर्चा झाली.

पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवारांना भविष्यात प्रधानमंत्री पदाची संधी मिळू शकते. यासाठी राष्ट्रवादीचे वजन दिल्लीत वाढवण्यासाठी शरद पवारांनी लोकसभेत जाणे गरजेचे आहे . अशी चर्चा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि आपल्यात झाल्याची माहिती मोहिते पाटलांनी दिली.
आपण पक्षाचे प्रमुख आहात . मात्र पक्षातीलच सहकार्यांनी केलेल्या मागणी वर आपण फक्त विचार न करता मान्यच करावे अशी आग्रही मागील यांनी केली. खूद्द विजयसिंह मोहिते पाटलांनी केल्याने आता पवार काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मागणीला आमदार गणपतराव देशमुख, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला .

error: Content is protected !!