पंढरीच्या जैनवाडीचा महेश जमदाडे एमपीएससीत राज्यात पहिला .

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून घेतली पदवी .
पंढरपूर :- राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तालुक्यातील जैनवाडीचा महेश दत्तात्रय जमदाडे यांनी मागासवर्गीयात पहिला क्रमांक मिळवला आहे. महेश जमदाडे हे भाळवणीच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत .
महेश जमदाडे हे शेतकरी कुटुंबातील आहेत . त्यांचे प्राथमिक शिक्षण जैनवाडीचा जिल्हा परिषदेत झाले. तर माध्यमिक शिक्षणाचे धडे श्रीमंतराव काळे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मध्ये गिरवले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले .
याच बरोबर डी एड पंढरपूरच्या अध्यापक विद्यालयातुन घेतले आहे .
डिसेंबर २०१६ पासून जमदाडेंनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यास सुरवात केली . विक्रीकर निरिक्षक म्हणून त्यांची निवड झाली असताना देखिल त्यांनी फक्त उप जिल्हाधिकारीच होणार म्हणून हे पद स्विकारले नाही.
कोणतीही शिकवणी नसताना घरीच अभ्यास आणि मावसभाउ उप जिल्हाधिकारी अभयकुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनमुळे हे ध्येय साध्या केल्याचे महेश जमदाडे यांनी सांगितले .
महेश जमदाडेंचे वडील शेतकरी आहेत . घरी आई , वडील , भाउ , पत्नी आणि एक वर्षाची कन्या असा परिवार आहे .
जिल्हा परिषदे शिक्षण घेतलेले विद्यार्थी लोकसेवा परिक्षेत बाजी मारतात हे जमदाडेंच्या यशामुळे पुन्हा सिध्द झाले .

error: Content is protected !!