पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा : खासदार राजू शेट्टी.

मंगळवेढा:- ”दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणूकीत नुसत्या बाता मारल्या गेल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा, त्यानंतर त्यानीच पाणी मागितले पाहिजे” असे प्रतिपादन खासदार राजू शेटटी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील हुन्नुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, कार्याध्यक्ष विजय रणदिवे, विष्णू बागल, अ‍ॅड राहूल घुले, नवनाथ माने, अमोल हिप्परगी, श्रीमंत केदार, अनिल बिराजदार, विजयकुमार पाटील, तात्या सावंत मल्लिकार्जुन भांजे, विकास पुजारी हणमंत यमगर, विठठल कोळेकर, आबा खांडेकर, भाऊसो गरंडे, नामदेव मेडीदार, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेटटी म्हणाले की, कृष्णा खोय्रातील पाणी कर्नाटकात वाया जाते हे पाणी अडवून या भागाला दिले दुष्काळी तीव्रता कमी होवू शकेल पण, पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण? म्हणून पाणी आणण्याची इच्छा होत नाही. साडे चार वर्षाच्या काळात शेतकऱ्याला आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची आश्‍वासनाची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय. दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत. शासन दुष्काळग्रस्त विदयार्थ्याला परिक्षा शुल्क माफ केल्याचा दावा करत असून यापेक्षा वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे. मागील सरकारच्या काळात छावणीत भष्ट्राचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली.
बाजारात घेणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जनावरे कमी दरात सुध्दा कोण घ्यायला तयार होईना. गोवंश हत्या बंदी कायदयामुळे जनावराचे काय करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांनी दौरा आणि जाहीरातीसाठी कोटयावधी रुपये खर्च केले. पण या भागात पाणी आणण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून निधी देत नाही. प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून अंबानी अदानी यांनी काढलेल्या विमा कंपन्यांच शेतकऱ्याला कर्जबाजारी करुन गबरगंड करुन ठेवल्या. त्यामुळे शेतकऱ्याला आता न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. भाजपाला मदत केल्याचा पश्चात्ताप होतोय. अच्छे दिन, कर्जमाफी, दिड पट हमी भाल याऐवजी विचित्र कायदे करून शेतकऱ्याला अडचणीत आणले.

error: Content is protected !!