२१ फेब्रुवारी रोजी खासदार शरद पवार माढ्यात . कार्यकर्त्यांशी साधणार संवाद .

पंढरपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे गुरुवार २१ फेब्रुवारी रोजी माढ्यात कार्यकर्त्याची बैठक घेणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी खा. शरद पवार हे कुर्डूवाडी टेभूंर्णी रस्त्यावरील स्नेहल लाॅन्स पिंपळनेर येथे येणार आहेत.

आगामी लोकसभेला खासदार शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील गटात नाराजीचा सुर आहे. या पार्श्वभूमीवर पवारांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
खासदार शरद पवारांनी २००९ साली माढ्यातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा एकतर्फी पराभव केला होता. मात्र आता पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २००९ नंतर मोहिते पाटलांना जिल्ह्यात झालेला विरोध त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागलाय. आता तर आहे ती लोकसभा राष्ट्रवादीने काढून घेतल्याची भावना मोहिते पाटील समर्थकांची झाली आहे. सोशल मिडियावर देखिल पवारांना पाडा असे संदेश फिरत आहेत. राष्ट्रवादीच्या या अंर्तगत गटबाजीवर आता जालिम उपाय म्हणून आता दस्तुरखुद्द शरद पवारच प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.
यामध्ये पवारांच्या विरोधात जरी रोष असला तरी खरी गेम ही मोहिते पाटलांनीच केल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. २००९ नंतर जिल्ह्यात उगवलेले राजकीय विरोधक. आणि पक्षांतर्गत वाढलेला विरोध. हे संपवून जिल्ह्यावर वर्चस्व गाजवायचे असेल तर पुन्हा पवारांना माढ्यात उभे केले पाहिजे . की ज्यामुळे पक्षांतर्गत विरोधक थोपवले जातील आणि जिल्हा पुन्हा ताब्यात येईल अशी चाल मोहिते पाटील गटाकडून खेळली जात असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात अशा राजकीय घडामोडी घडत असताना देश पातळीवर खासदार शरद पवारांना भावी प्रधानमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने पाहिले जात आहे.
माढ्यात कोणीही असंतुष्ट राहु नये यासाठी खुद्द शरद पवार आता मैदानात उतरले आहेत . आता या बैठकीला कोण कोण उपस्थित राहते यावर पवारांचे मताधिक्य अवलंबून असणार आहे.

error: Content is protected !!