धरणग्रस्त आंदोलक तहसिल आणि पंचायत समिती कार्यालयात गेले आणि ……

धरणग्रस्त आंदोलकांनी केली तहसिल व पंचायत समिती आवाराची स्वच्छता…..
संत गाडगेबाबा जयंती प्रत्यक्ष कामातुन साजरी
पंढरपुर:- तहसिल कार्यालयासमोर धरणग्रस्तांचे गेले तेरा दिवसापासुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज संत गाडगे बाबांची जयंती साजरी होत आहे. त्यानिमीत्ताने गावोगावी ग्रामसभा व शासकीय कार्यालयामधुन प्रतिमांना पुष्पहार घालून साजरी होत आहे.परंतु आज धरणग्रस्त आंदोलकांनी गाडगे बाबांना अभिप्रेत असणारी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.


आंदोलन ठिकाणी गाडगे बाबां च्या प्रतिमेला हार घालुन तहसिल कार्यालय आवार व स्वच्छता अभियान राबवणाऱ्या पंचायत समिती आवाराची स्वच्छता केली यावेळी गोळा झालेला कचरा फेकुन न देता जाळण्यात आला.आंदोलक ऊस्फुर्तपणे करत असलेल्या स्वच्छतेमध्ये नायब तहसिलदार तिटकारे सहभागी झाले होते.स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य खराटा,झाडू,कार्यालयातील कर्मचारी यांनी दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले.यावेळी मोहन अनपट,रणजीत जगताप,अमोल देवकर,नागेश झेंडे,छगन कांबळे,जगन्नाथ देशमुख,रामचंद्र मांढरे,संतोष सलगर,बी.डी.आरकिले,रावसाहेब देवकर,सुनिल गोळे,सोमनाथ गुटाळ,विनायक झेंडे,भाऊ खरात,ऊत्तम गोपणे,कोडींबा वांगडे,हणमंत बामणे,अंकुश बामणे,महादेव सावंत ,आण्णा बोरकर,कांताराम आठवे,महादेव सलगर,जगन्नाथ सावंत,पोपट कांबळे इत्यादी धरणग्रस्त उपस्थीत होते.

error: Content is protected !!