सांगोला शहरात दोन गटातील बाचाबाचीतुन भीम नगर मध्ये तुफान दगडफेक.

पोलिसांच्या गाडी सह नगरसेवकांच्या गाड्या फोडल्या.

पंढरपूर :- सांगोला शहरात शिवजयंती मिरवणूकीवरुन जाणाऱ्या कार्यकर्त्याची भीम नगर मध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेकीत झाले आहे. दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली असून यामध्ये पोलिसांच्या गाडीसह भीम नगर मधिल गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. भीम नगर मधिल काही महिला जखमी झाल्याची प्रार्थमिक माहिती पुढे येत आहे.
मागील वर्षी देखिल असाच प्रकार घडल्याने यावर्षी पोलिसांनी दक्षता घेणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेण्या पलीकडे काहीचं केले नसल्याचा आरोप आता केला जात आहे.
शिवजयंतीची शांततेत निघालेली ऱॉली अचानक आपला मार्ग बदलुन भीम नगर कडे वळाली. यानंतर झालेल्या घोषणाबाजी मुळे वातावरण तापले. आणि तुफान दगडफेक करण्यात आली.
वास्तविक भीम नगर मधिल नागरिक हे शिवजयंती करण्यात व्यस्त असताना हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभू हे सांगोला शहराला भेट देण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eight + fourteen =

error: Content is protected !!