सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदा भाऊ खोतांना शेतकऱ्याने मागितले जनावरांना पाणी .

पंढरपूर :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांच्या यशा पाढा वाचणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना भर सभेत शेतकऱ्याने जनावरांना पाणी द्या आणि वीज देण्याची मागणी करत जाब विचारला.
आज रविवारी भाजपच्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूरात संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक , आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रा. शिवाजी सावंत, शैलाताई गोडसे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री खोत यांनी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी किती नव्या योजना आणल्या. देशाच्या सुरक्षेपासून शेततळ्या पर्यंत त्यांनी आक्रमकपणे सरकारची यशोगाथा मांडली. मात्र सभेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्याला हे रुचले नाही. दत्ता नावाच्या जेष्ठ शेतकऱ्याने सभेत उभे राहुन शेतकरी सध्या कोणत्या अडचणींना तोंड देतोय हे मांडले. मंत्री साहेब गेली अनेक दिवस झाले आमची गुरं पाण्या वाचून मरत आहेत. त्यांना चारा आणि पाणी द्या. तसेच पुरेसी वीज नसल्याने पिके जळून जात आहेत. तर आम्हाला चारा,पाणी आणि वीज देण्याची मागणी केली.
शेतकऱ्याच्या या अनपेक्षित प्रश्नाने मंत्री महोदय बुचकळ्यात पडले. त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या असे म्हणत सावरासावर केली. मात्र शेतकरी आक्रमकपणे बोलत होते. अखेर शेतकरी ऐकत नाही असे दिसू लागल्यावर आमदार प्रशांत मालक परिचारकांनी “ऐ दत्ता बस आता” असा आदेश दिला आणि आपल्या व्यथा मांडता मांडता दत्ता खाली बसला.

error: Content is protected !!