“ऐ तु सभा झाल्यावर बोल” , भाजप उमेदवार सिध्देश्वर स्वामींना जाब विचारणाऱ्या युवकाला आमदार प्रशांत परिचारकांचा गर्भीत दम!

पंढरपूर :- देशात लोकसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात गौडगाव मठाचे मठपती डॉ. सिध्देश्वर स्वामींना भाजपने उमेदवारी दिली आहे. मीच देव आहे या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज सोमवारी पहिल्यांदाच स्वामी प्रचारासाठी पंढरपूर तालुक्यात गोपाळपुरात प्रचारासाठी आले होते. या सभेत एका युवकाने गावातील गटार करण्यात राजकारण होत असल्याबद्दल स्वामींना जाब विचारला असता आमदार प्रशांत परिचारकांनी त्या युवकास “ऐ तु सभा झाल्यावर बोल” अशी दमबाजी केली.
भाजपचे उमेदवार सिध्देश्वर स्वामी हे मीच विठ्ठल आणि आई जगदंबे पेक्षा मोठा देव असल्याचे वक्तव्य करुन अडचणीत आले आहेत. पंढरपूर मतदारसंघातील जबाबदारी असणारे आमदार प्रशांत परिचारक देखिल सैनिकांच्या पत्नी विषयी वादग्रस्त विधान केल्याने आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. मात्र आपल्या गावात गटारी बांधण्यात देखिल राजकारण होत आहे. हे आपण कसे रोखणार या विषयी गोपाळपुरच्या सभेत एका युवकाने लोकसभेचे उमेदवार सिध्देश्वर स्वामींना जाब विचारला. यावर स्वामींनी तुम्ही प्रशांत मालकांच्या कानात जरी संगितले तर थेट विठूरायाला सांगितल्यासारखे होईल असे सांगत वेळ मारली. मात्र साक्षात महसूल मंत्र्यांसमोर जनावरांना पाणी मागणाऱ्या ६० वर्षाच्या शेतकऱ्याला “ऐ दत्ता शांत बस” ये दत्ता बस आता. असा आदेश देणारे आमदार प्रशांत मालक या युवकाच्या प्रश्नावर भडकले. आणि पुन्हा आपल्या सत्तेचा थाट दाखवत “ये तु सभा झाल्यावर बोल” ‘ तु सभा झाल्यावर बोल’ असा गर्भीत दम त्या युवकाला दिला.
भाजपच्या सत्ताकाळात अनेकांची मुस्कटदाबी केली जात आहे. याचे लोन आता आमदार परिचारकांच्या रुपात ग्रामीण भागत देखिल पोहचले आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवार सिध्देश्वर स्वामी आणि आमदार परिचारक हे दोन वाचाळवीर सोलापूर लोकसभा कशी जिंकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!