जन्मदात्या आईने विष देवून केला दोन चिमुकल्यांचा खून . स्वतः केला आत्महत्येचा प्रयत्न.

उत्तर सोलापूर:- उत्तर सोलापूर मधील नान्नज येथील रेश्मा कृष्णा भोसले हिने स्वतः च्या दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले( वय ४),श्रेया कृष्णा भोसले( वय-२) दोन्हीही मुलींना विष पाजून स्वतः ही फासी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, दोन्ही मुली मृत झाल्या असून रेश्माही अत्यावस्थेत असून  पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
     नान्नज गावापासून काही अंतरावर कृष्णात भोसले यांच्या  शेतात कुटुंब राहत आहे.ते शेतमजुरी करून आपली उपजीविका करत होते.शनिवारी सकाळी कोटुंबिक कारणांच्या निमित्ताने पती व पत्नी मध्ये वाद झाला.याचा राग मनात धरून दुपारी रेष्मा कृष्णा भोसले वय (२९) हिने आपली दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले वय -४  , श्रेया कृष्णा भोसले वय -२ या आपल्या स्वताच्या मुलींना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेले कराटे नावाचे विषारी द्रव्य पाजले. स्वताही औषध पिण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर घरात दोरखंड लावून गळफास घेण्याचा प्रयन्त केला.  घरासमोरील मोठ्या सिंटेक्स टाकीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजारील काही व्यक्तीने तिला बाहेर काढूले.  दोन  मृत मुलींना व रेश्मा भोसले हिला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केली आहे.या घडलेल्या घटनेने नान्नज व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.पूढील तपास पोलिस करत आहेत.

error: Content is protected !!