नगरसेवक आनंद चंदनशिंवेंवर गुन्हा दाखल करा. सोलापूरात शिवभक्तांची मागणी.

सोलापूर :- रविवार २१ एप्रिल रोजी सोलापूर शहरात निघालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत छत्रपती शिवरायांची विटंबना झाल्याचा आरोप करीत मंडळाचे प्रमुख नगरसेवक आनंद चंदनशिवे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूरातील शिवप्रेमींनी केली आहे. आज बद्दल आज पोलिस आयुक्त महादेव तांबडेंना निवेदन देण्यात आले.
शिवप्रेमींनी दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या पी बी ग्रूपने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिवछत्रपतींच्या रुपात सिंहासनावर विराजमान झालेली प्रतिकृती साकरण्यात आली होती. यावरुन शिवप्रेमींमध्ये छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाल्याची भावना निर्माण झाली. पी बी ग्रूपने हा प्रकार जाणीवपूर्वक आणि खोडसाळपणे केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच या जातीयवादी कृत्याने शहरातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवप्रेमींचे निवेदन

दोन महिन्यापासून शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप
शिवप्रेमींनी दिलेल्या निवेदनात पी बी ग्रूप आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे हे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील शांतता बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र दोन महिन्यात चंदनशिंवे आणि त्यांच्या ग्रूपने असे कोणते कृत्य केले याचे स्पष्टीकरण या निवेदनात देण्यात आले नाही. मात्र लोकसभा निवडणूकीत वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे सोलापूरातुन निवडणूकीला उभे होते. या काळात चंदनशिवेंनी सर्व आंबेडकरी समाज एकत्र करुन बाळासाहेबांच्या पाठीशी उभा केला होता. तसेच त्यांनी सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता.
दरम्यान सर्वश्री दिलीप कोल्हे, राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, माऊली पवार, राम जाधव, सोमनाथ राऊत, किरण पवार,रवी मोहिते,योगेश पवार, दास शेळके,भाऊ रोडगे,नाना काळे, ज्ञानेश्वर सपाटे, नगरसेवक अमोल शिंदे,प्रताप कांचन, श्रीकांत घाडगे,लहू गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती संबधितांनी दिली.

error: Content is protected !!