पंढरीत युवकाला सिनेस्टाईल मारहाण. गुन्हा दाखल आरोपी मोकाट .

पंढरपूर : मागील भांडणाचा राग मनात धरून २० ते २५ तरुणांनी एकत्र येऊन एकाला जबरदस्तीने गाडीवर बसवून नागालँड हॉटेल व अहिल्यादेवी चौक येथे नेहून मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणे सातच्यासुमारास घडली आहे. वरील सर्वांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित कुमार बाबर (रा. व्होळे, ता. पंढरपूर, सध्या लाजीज पिझ्झा दुकानात पंढरपूर) व रोहित चंदनशिवे (रा. व्होळे, ता. पंढरपूर) यांच्याशी किरकोळ कारणावरून म्हमाजी इंगोले, संभाजी भोसले, आकाश साळुंखे, संग्राम भोसले, अनिकेत भोसले (सर्व रा. भोसले चौक, पंढरपूर) यांचा वाद के बी पी कॉलेज येथे २१ एप्रिल रोजी झाला होता.

या भांडणाचा राग मनात धरून म्हमाजी इंगोले, संभाजी भोसले, आकाश साळुंखे, संग्राम भोसले, अनिकेत भोसले (सर्व रा. भोसले चौक, पंढरपूर) व इतर तरुणांनी बेकायदेशीर जमाव करून रोहित बाबर व रोहित चंदनशिवे यांना २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लींक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ अडवले. चंदनशिवे व बाबर याला त्या ठिकाणी मारहाण केली. त्यांनतर रोहित चंदनशिवे यास जबरदस्तीने गाडीवर बसून नागालँड हॉटेल व अहिल्यादेवी चौक येथे नेहुन मारहाण केली.
यामुळे वरील संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम १४३, १४९, ३६३, ३६५, ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होवून २४ तास उलटले तरी अद्याप कोणाला अटक केले नसल्याची माहिती पुढे येत आहे.

error: Content is protected !!