राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगोला, मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर. जाणून घ्या संपूर्ण दौरा.

पंढरपूर :- राज्यातील लोकसभेच्या निवडणूका आज सोमवारी पार पडल्या. राज्यात चार टप्प्यात निवडणूला घेण्यात आल्या. गेली महिनाभर प्रचाराचा धुराळा उडत होता. तर दुसरीकडे राज्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती होती. आज लोकसभेचा चौथा आणि अखेरचा टप्पा पार पडल्या नंतर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी आपल्या दुष्काळ पहाणी दौऱ्याला सुरवात केली आहे. पवार उद्या मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यांच्या दौऱ्यावर येत आहेत.
माजी आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार असा असेल पवारांचा दौरा.
खासदार शरद पवार हे सकाळी १०:३० वाजता बारामती वरुन हेलिकॉप्टरने सांगोल्याकडे प्रयाण करतील. ११:१५ सांगोल्यात आगमन झाल्यावर मोटारीने ते अजनाळे गावाकडे प्रयाण करणार आहेत. ११:३० ते १ वाजेपर्यंत अजनाळे गावातील पाण्यावाचुन जळत असलेल्या डाळिंबाच्या बागा , कोरडी शेततळे कोरडे तलाव याची पहाणी करतील. १ ते साधारण २ वाजेपर्यंत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांशी पवार संवाद साधणार आहेत. २ ते २:४५ मंगेवाडी गावात भोजन आणि राखीव वेळ असणार आहे. ३ वाजता पुन्हा ते वाटंबरे गावाकडे प्रयाण करणार आहेत. ३:४५ पर्यंत ते चारा छावणीला भेट देणार आहेत.
सांगोल्याचा पहाणी दौरा झाल्यानंतर ते मंगळवेढ्याकडे प्रयाण करणार आहेत. ४:१५ ते ४:४५ पर्यंत शिरसी येथिल चारा छावणीला भेट देतील. त्यानंतर पुढे खुपसंगी गावाचा पहाणी दौरा पवार करणात आहेत. खुपसंगीत ते शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. ६ वाजता खासदार शरद पवार खुपसंगी वरुन सोलापूर कडे कुच करणार आहेत.
७:३० वाजता सोलापूरच्या पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात ७८ सभा घेतल्यानंतर लगेच पवार दुष्काळी भागात भेटीला निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. २००९ ते २०१४ याकाळात पवार माढ्याचे खासदार आणि केंद्रात कृषीमंत्री असताना दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरभरून मदत केली होती.

error: Content is protected !!