….. तर सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर यावे लागेल – खासदार शरद पवार

आमदार हनुमंत डोळसांच्या निधनाने पवारांनी अर्धवट सोडला दौरा .
सांगोला:- राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. सांगोला तालुक्यात तर पाण्या अभावी पिके जळत आहेत. जनावरे कसायाच्या दावणीला बांधण्याची वेळ आली. ही गंभीर परिस्थिती राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर मांडणार आहे. जर त्यांनी यावर काही उपाययोजना केल्या नाहीत तर सरकारला तुमच्या बांधावर यावे लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी सरकारला दिला आहे. सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पहाणी करण्यासाठी ते आले असता त्यांनी छावणीतील पशूपालकांशी संवाद साधला.
यावेळी आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत नाना भालके , माजी आमदार दिपक आबा साळुखे पाटील आदी उपस्थित होते.
खासदार शरद पवारांनी सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी, अजनाळे गावात चारा छावण्या, कोरडी पडलेली शेतताळी , जळालेल्या डाळिंबाच्या बागांची पहाणी केली. त्यानंतर यांनी अजनाळे येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पवारांसमोर अनेक समस्या मांडल्या.
आमदार डोळस यांच्या निधनाने दौरा अर्धवट.
दरम्यान पवारांचा दौरा सुरु असतानाच माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनाची बातमी आली. पवारांनी आपल्या एका सहकार्याचा मृत्यू झालेल्या दु:ख व्यक्त केले आणि सामुदायिक श्रध्दांजली अर्पण केली. डोळस यांच्या अकाली मृत्यूने आपण हा दुष्काळी दौरा रद्द करत असल्याची घोषणा पवारांनी केली. सांगोल्यानंतर ते मंगळवेढ्याची पहाणी करुन सोलापूर मुक्कामी जाणार होते. बुधवारी ते लातुर, उस्मानाबादचा दुष्काळी दौरा करणार होते. मात्र त्यांनी आपले सर्व दौरे रद्द केले.

error: Content is protected !!