वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक माउली हळणवर यांच्यासह एकावर तलवारीने हल्ला .

पंढरपूर :- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर यांच्यासह एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना ईश्वर वठार येथे घडलीय. माऊली हळणवर यांच्यासह तानाजी हळणवर गंभीर जखमी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावातील एका खासगी सावकाराने गावातीलच एका महिलेची जमीन हडप केल्याची तक्रार सोमवारी पोलिसात दाखल झाली होती. सुरेखा तानाजी हळणवर यांची जमीन खासगी सावकाराने हडप केल्याची ही तक्रार आहे. या हल्ल्यात सुरेखा यांचे पती तानाजी देखिल गंभीर जखमी आहेत.
सदरच्या प्रकरणात माऊली हळणवर यांनी गुन्हा दाखल करण्यात पुढाकार घेतल्याचा राग मनात धरुन या खासगी सावकाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. माऊलीच्या डोक्यात वार झाल्याने प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

error: Content is protected !!