रमाई घरकुलाच्या “त्या” लाभार्थ्यास मिळणार मोफत वाळू . २ मे पासून मिळणार पाच ब्रासचे परवाने.

नगरसेवक डि.राज सर्वगोड यांच्या पाठपुराव्यास यश 

पंढरपूर:- शहरातील रमाई आवास योजनेअर्तंगत घरकुलांसाठी निधी उपलब्ध होऊनही वाळू अभावी बहुतांश घरकुलांचे काम रखडले होते. शासन आदेश असताना देखिल वाळू उपलब्ध होत नव्हती. याबद्दल नगरसेवक डी राज सर्वगोड यांनी पाठपुरावा केला आणि अखेर घरकुलास वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ मे 2019 पासून आर्थिक दुर्बल लाभार्थ्यास मोफत तर एपीएल कार्डधारकास रॉयल्टी भरुन वाळू मिळणार आहे अशी माहिती डी राज सर्वगोड यांनी दिली.
घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना शासकिय दरात तर अर्थिक द्रष्ट्या दुर्बल घटकांना 5 ब्रास वाळू मोफत मिळावी असे आदेश शासनाने 5 ऑक्टोंबर 2018 रोजी दिले होते.या आदेशाची अंमलबजावणी करुन शहरातील रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाळूसाठीचे परमीट उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व तहसिलदार मधुसुदन बर्गे यांच्याकडे 10 ऑक्टोंबर 2018 रोजी निवेदनाद्वारे केली होती.


पंढरपूर शहरात रमाई आवास योजनेच्या 500 घरकुलांना मंजुरी मिळाली असून निधीही उपलब्ध झाला आहे.मात्र वाळूअभावी सदर घरकुलांचे काम रखडले आहे.ही समस्या लक्षात घेवून निवेदन देण्यात आले होते व सातत्याने या बाबत पाठपुरावा करण्यात येते होता. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार 2 मे 2019 पासून घरकुल लाभार्थ्यांना वाळूसाठी आवश्यक ते परमिट उपलब्ध करुन दिले जातील अशी माहीती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.

      या बाबत अधिक माहीती देताना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,पंढरपुर शहरात रमाई आवास योजनेअर्तंगत 261 घरकुलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.मात्र वाळू अभावी अनेक घरकुलांचे काम ठप्प होतेे.घरकुलाच्या लाभार्थ्यांना शासकिय दराने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली होती.या मागणीची दखल घेत आता पंढरपूर शहराबरोबरच तालुक्यातीलही विविध योजनाअर्तंगत घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना शासनाने निश्‍चीत केलेल्या स्वामित्वधनाची(रॉयल्टी) पुर्तता केल्यानंतर वाळू उपलब्ध होणार आहे तर अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकांना कुठल्याही प्रकारचे स्वामित्वधन(रॉयल्टी) आकारले जाणार नाही.   

      यावेळी पंढरपूर नगर पालीकेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे,गटनेते सुरेश नेहतराव,नगरसेवक महादेव भालेराव,प्रशांत शिंदे,राहुल साबळे,महादेव धोत्रे,निलेश आंबरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!