लोकसभा निवडणूकी नंतर वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ले. कारवाई साठी नेत्यांचे निवेदन.

पंढरपूर :- लोकसभा निवडणूकीत शेवटच्या क्षणी स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापितांच्या तोंडचे पाणी पळवले होते. सोलापूर मतदारसंघात तर स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर हे निवडणूक रिंगणात उतरल्याने तिरंगी लढत झाली. बाबासाहेबांचे नातू उभे राहिल्याने वंचित आघाडी, एम आय एम आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. हाच प्रचार आता त्यांच्या मुळावर उठला आहे. मतदानानंतर मंगळवेढा, पंढरपूर येथे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली तर सोलापूरात एम आय एमचे अध्यक्ष तौफिक शेख यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणाची वंचित आघाडीच्या नेत्यांनी दखल घेतली आहे. आज सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील आणि पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

पंढरपूर तालुक्यातील इश्वर वठार येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने वंचित आघाडीचा माढा मतदारसंघात प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. असाच प्रकार मंगळवेढ्यात देखिल घडला. तर वंचितचे जिल्हा संघटक माऊली हळणवर यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. या तीनही प्रकरणांची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले.
तसेच एम आय एमचे शहराध्यक्ष नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय द्वेषाने दाखल झाला असल्याचा संशय व्यक्त करीत वंचित आघाडीच्या वतीने सोलापूर शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले. तौफिक शेख यांच्या वरील गुन्हाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
वंचित आघाडीने दलित, मुस्लिम आणि धनगर समाजाला एकत्रित करुन राज्यात नवे सोशल इंजिनिअरिंग केले. प्रस्थापित राजकीय पक्षांना हे रुचले नाही. कॉंग्रेसचा हक्काचा दलित आणि मुस्लिम दुरावला गेला तर भाजपाचा ओबीसी दुरावला गेला. त्याचे पडसाद आता गावागावात उमटण्यास सुरवात झाली. त्यामुळे वेळीच सतर्क होत वंचित आघाडीच्या नेत्यांनी लक्ष घालण्यास सुरवात केली आहे.
आज निवेदन देताना नगरसेवक रवी(बॉस)गायकवाड ,नगरसेवक आनंद(दादा)चंदनशिवे ,GM ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे , बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित(भाऊ)गायकवाड डी.एन.गायकवाड,अरुण भालेराव, शांतीकुमार नागटिळक, मिलिंद नाना प्रक्षाळे, राहुल शंके, अश्विन भाईजी शिंदे, खंडू साबळे, बबन शिंदे आदी उपस्थित होते

error: Content is protected !!