दुष्काळाचा दाह सोसणारी जनावरे देखिल अडकली “आधार” च्या कचाट्यात . 

मंगळवेढा:- देशातील नागरिकांना ओळख म्हणून सरकारने प्रत्येकाला आधार कार्ड दिले. हे कार्ड नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभ घेण्यासाठी बंधनकारक करण्यात आले. आधार कार्ड वरुन देशात अनेकवेळा गोंधळ उडाला आहे . आजही अनेक नागरिक आधार कार्ड पासून वंचित आहेत. देशातील जनते बरोबरचं आता जनावरांना देखिल आधार कार्डचा फटका बसत आहे. दुष्काळाचा दाह सोसणाऱ्या या जनावरांना मालकाचे आधार कार्ड चारा छावणीत जमा न केल्याने आठ दिवस पशुखाद्य दिले नसल्याचा गंभीर प्रकार मंगळवेढ्यात उघडकीस आला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. मंगळवेढा , सांगोला भागात याची दाहकता जास्त आहे. चारा, पाण्या अभावी जनावरे कसायाला विकण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. डिसेंबर पासून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी केली जात होती. सरकारने अखेर मे पासून मंगळवेढा आणि सांगोल्यात छावण्या सुरु केल्या. मात्र ५४ पैकी १० जाचक अटी कमी करुन सुध्दा पशुपालकांच्या मागील कटकटी कमी होताना दिसत नाहीत. 

पशुपालकाचे आधार कार्ड जमा न केल्याने मंगळवेढ्याच्या गणेशवाडीतील छावणीत आठ जनावराला पशूखाद्य दिले नाही. या विषयी ७० वर्षाचे भानुदास रामू काकेकर हे पशूपालक आपली व्यथा सांगत आहेत. 

काकेकर यांनी आपली चार मोठी आणि एक लहान अशी पाच जनावरे ४ मे रोजी गणेशवाडीच्या श्रीराम सहकारी दूध संस्थेच्या छावणीच्या दावणीला बांधली. छावणी चालकाने शासकीय नियमानुसार त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि शेतीचा ८ अ जमा करण्याच्या सुचना केल्या. काकेकरांनी रेशन कार्ड आणि ८ अ चा उतारा जमा केला. मात्र आधार जमा न केल्याने त्यांच्या जनावरांना पशुखाद्य दिले गेले नाही. गेल्या  दिवसात फक्त उस खाल्याने जनावरांच्या जीभेवर चिरा पडल्याचे काकेकर सांगतात. निसर्ग कोपल्याने आम्हाला घरदार सोडून छावणीत राहण्यासाठी आलो. मायबाप सरकारने सोय केली मात्र आधार दिला नाही. आधार कार्ड जमा न केल्याने माझ्या जनावरांना पशुखाद्य मिळले नाही. काकेकर आपली  व्यथा सांगताना मंगळवेढ्याचे मंडल अधिकारी आर एम मोरे देखिल उपस्थित होते. याविषयी त्यांना विचारणा केली असता कागदपत्र पुरततेची वाट न पहाता चारा आणि पशुखाद्य देण्याच्या सुचना केल्याचे सांगितले . आणि तात्काळ काकेकरांना पशुखाद्य देण्याच्या सुचना छावणी चालकाला दिल्या . 

छावणी चालू करण्याचा आदेश काढल्यावर साधारण ५४ अटी नियम दिले होते . या अटीशर्थींमुळे छावणी सुरु करण्याचे धाडस कोण करत नव्हते. तसेच या अटी जाचक असल्याच्या तक्रारी पशुपालकांनी देखिल केल्या होत्या. यातील १० अटी सरकारने कमी केल्या आहेत. मात्र आधार काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ओळखीसाठीचा आधार कार्ड मध्ये आता जनावरे देखिल अडकल्ताचे दिसत आहे. सरकारच्या या जाचक अटी शर्ती मधुन जनावरे देखिल सुटले नाहीत. 

error: Content is protected !!