नरेंद्र मोदी हे “युनायटेड” इंडियाचे प्रतिनिधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली मोदींची पाठराखण.

सांगोला:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे युनायटेड इंडियाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करताना कोणताच दुजाभाव केला नाही. देशात दुफळी निर्माण होईल असे वागले नाहीत. टाईम्स या नियतकालिकेने मोदींचा देशाचे “डिव्हायडर” म्हणून उल्लेख चुकीचा असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केला आहे.
सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथिल चारा छावणीला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, युवकचे राज्य संघटक ॲड. किर्तीपाल सर्वगोड, सेनेचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजपच्या नेत्या नागने, कुमार भोसले, रामस्वरूप बनसोडे, सचिन भोसले, खंडु सातपुते, हनुमंत साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सत्ताकाळात कधीही जातीयवाद केला नाही. सरकारच्या योजना प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सरकारी योजने लाभापासून कोणत्या एखाद्या समाज घटका रोखले नाही. त्यांच्यावर बंधन लादले नाही . कधीही कोणत्या एका धर्माचा प्रचार केला नाही. त्यांनी सबका साथ सबका विकास हेच धोरण राबवले. त्यामुळे टाईम्स मासिकाने चुकीची मांडणी केली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ना. आठवले म्हणाले, गेल्या सत्तर वर्षात पाण्याचे धोरण, नियोजन केले नाही. देशात एका भागात पाणी वाहून जाते. तर दुसरा भाग कोरडा पडतो. हे रोखण्यासाठी नद्याजोड प्रकल्प राबवले जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जनावरांच्या चारा छावण्यामध्ये पशुपालकांना रोजगार हमी लागू करणे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे, छावणी सुरु करण्यासाठी पाच लाख रुपयांची अट शिथिल करणे, जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यची मर्यादा वाढवणे यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!