माजी नगरसेवक सचिन डांगे यांचे निधन .

पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सचिन डांगे यांचे आज सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. त्यांना तात्काळ सोलापूरला उपचारासाठी हलवण्यात आले. उपचारादरम्यान सकाळी त्यांचे निधन झाले. विद्यामान नगरसेविका सुप्रिया डांगे यांचे ते पती आहेत.
अंत्यंत शांत , मनमिळाऊ व्यक्ती म्हणून ते सर्वांच्या जवळचे होते. शहर आणि जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन डांगे यांच्यावर सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात्य 1 मुलगा 1 मुलगी पत्नी स्थायी समितीचे सदस्य व नगरसेविका सुप्रिया डांगे आई वडील बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!