अवैध वाळू उपसाप्रकरणी तक्रार कराल तर गुन्हे दाखल करू उपजिल्हाधिकाºयांची धमकी.

तक्रारदार हतबल; अवैध वाळू उपसा सुरूच

पंढरपूर:- पटवर्धन कुरोली येथील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडले आहे़ त्यामुळे नदीपात्रातून रात्रन्दिन बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरू आहे़ याबाबत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव खेडेकर यांनी उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना मोबाईलद्वारे वाळू उपसा विषयीची माहिती देताच त्यांनी तुम्ही वाळू चोरांची नावे सांगा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिल्याने तक्रारदारही हतबल झाले आहेत़ प्रशासन कारवाई करीत आहोत, असे सांगत असले तरी पटवर्धन कुरोली परिसरात अवैध वाळू उपसा सुरूच आहे़.
भीमा नदीचे पात्र गेल्या १५ दिवसांपासून कोरडे पडले आहे़ याचाच फायदा घेऊन अवैध वाळू उपसा करणाºया वाळू माफियांनी रात्रन्दिवस नदी पात्रातून ट्रॅक्टर, टिपरच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू केला आहे़ त्यानंतर काही ग्रामस्थांनी करकंब पोलीस ठाणे, महसूल प्रशासनाकडे याबाबत गुप्त माहिती दिली़ त्यानंतर महसूल, पोलीस प्रशासनाने नेहमीप्रमाणे गावात कारवाईसाठी यायचे, पण ते येण्यापूर्वीच गावात खबर पोहोचत असल्याने त्यांच्या हाती काहीही लागत नाही़ त्यानंतर त्यांनी तक्रारदारांनाच तुम्ही अवैध वाळू उपसा करणाºयांची नावे सांगा, आम्ही कारवाई असे उलट प्रश्न करण्यात येत असल्याने तक्रारदारांची गोची झाली आहे़
दोन दिवसापूर्वी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव खेडेकर (पटवर्धन कुरोली) यांनी गावातील अवैध वाळू उपसाप्रकरणी उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना गावात सुरू असलेल्या प्रकारासंबंधी माहिती दिली़ त्यानंतर वाळू चोरांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उपजिल्हाधिकारी मात्र तक्रारदारावर भडकले़ तुम्ही गावातीलच आहात ना?, मग तुम्ही काय करता़? तुम्ही वाळू चोरांना पकडून द्या, असे म्हणत थांबा!, आता तुमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करतो़ अशी धमकीच दिली़ या संभाषणाची क्लिप सध्या तालुक्यातील वॉटस्अप ग्रुपवर व्हायरल होत आहे़ त्यामुळे प्रशासन वाळू उपसा विरोधात करीत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे़
याविषयी उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला त्यावेळी त्यांनी इतर बाबींची माहिती दिली, मात्र तक्रारदार प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याविषयी ते काहीही बोलले नाहीत़

पटवर्धन कुरोली येथील नामदेव खेडेकर यांच्याशी आपले मोबाईलवरून चर्चा झाली़ मात्र त्यांना आमच्या विरोधात खोट्या तक्रारी करण्यास कोणीतरी भाग पाडत आहेत़ आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आमची कारवाई सुरू आहे़ हवे तर तुम्ही आमचे तहसीलदार व संबंधित अधिकाºयांकडून माहिती घ्यावी, ते तुम्हाला सांगतील़
– रामचंद्र शिंदे,
उपजिल्हाधिकारी

error: Content is protected !!