वंचित आघाडीला रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपा देणार “या” दोन दलित नेत्यांवर मोठी जबाबदारी!

सोलापूर :- राज्यात लोकसभा निवडणूकीत वंचित फॅक्टरने धुमाकूळ घातला. याचा सर्वात मोठा फटका कॉंग्रेसला बसला आहे. तसेच काही मतदारसंघात युतीला देखिल पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीकडे आरपीआयचे अध्यक्ष ना. रामदास आठवले असल्याने युतीला फटका बसण्याचे प्रमाण कमी आहे. भविष्यात कॉंग्रेसने राज्याचे माजी सामाजीक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि भाजपने माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची गरज निर्माण झाली असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी दलित,मुस्लिम आणि धनगर समाजाला मोठ्या प्रमाणात लोकसभेला प्रतिनिधित्व दिले. आजपर्यंत सत्तेपासून वंचित राहिलेल्या प्रत्येक समाजाला त्यांनी हाक दिली. ४८ जागांवर उमेदवार उभे करुन त्यांना ताकत देण्याचे काम केले. कॉंग्रेस प्रमाणे फक्त जागा सोडून पाडण्याचे काम बाळासाहेबांनी केले नाही. राज्यातला पहिला मुस्लिम खासदार दिल्लीला पाठवण्याचे काम या वंचित आघाडीने केले. तर गोपीचंद पडळकर, यशपाल भिंगे सारख्या अनेक धनगर बांधवांना विजयाच्या उंबरठ्यावर आणले. एक वर्षाचा पक्ष आणि दोन महिन्याची लढाई खुप काही उलथापालथ करुन गेली. अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक घटकाला त्याचे प्रतिनिधित्व वंचित आघाडीने दिले. त्यामुळे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या कॉंग्रेसचा खरा चेहरा पुढे आला. वंचित आघाडी मुळे कॉंग्रेस दोन माजी मुख्यमंत्री पराभूत झाले.
वंचितने महायुतीला देखिल पाणी पाजण्याचे काम केले. महायुतीच्या पराभूत जागांवर वंचितचा प्रभाव दिसून आला. आरपीआयचे राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले यांनी राज्यात सर्वत्र सभा घेवुन महायुतीला ताकत दिली. त्यामुळे सोलापूर वगळता बऱ्यापैकी दलित समाज महायुती सोबत राहिला.
आता विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. कॉंग्रेस मध्ये फेरबदलाचे वारे सुरु झाले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर विरोधीपक्षनेते विखे पाटील भाजपात डेरेदाखल झाले आहे.
वंचितला तोंड देण्यासाठी आंबेडकरी विचाराच्या नेत्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे अशी मागणी आता होत आहे. आघाडी सरकारच्या काळात चंद्रकांत हांडोरे हे सामाजिक न्यायमंत्री होते. रमाई घरकुल योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. राज्यात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते सर्व दुर पसरले आहेत. त्याचा फायदा विधानसभेला नक्कीच कॉंग्रेसला होवु शकतो. सध्या हांडोरे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. एक सामान्य कार्यकर्ता ते मंत्री अशी त्यांची आंबेडकरी समाजात ओळख आहे. कॉंग्रेस मध्ये राहून सुध्दा त्यांनी आपला आंबेडकरी विचार सोडला नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे दलित समाज त्यांच्यावर विश्वास ठेवु शकतो. राज्यात पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी ये मेहनत घेवु शकतात.
आरपीआयचे अध्यक्ष ना. रामदास आठवले हे देशाचे राजकारण करतात. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत त्यांचा पक्ष पसरला आहे. राज्यात भाजपाकडे मातंग समाजाच्या प्रतिनिधी म्हणून दिलीप कांबळे हे फार प्रभाव टाकू शकले नाही. त्यांच्या सोबत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सारखा नेता असणे गरजेचे आहे. ढोबळे सरांना माननारा एक वर्ग राज्यात कार्यरत आहे. आपल्या वकृत्वाच्या जोरावर ते भाजपला फायदेशीर ठरु शकतात. लोकसभा निवडणूकीत त्यांनी राज्यात ५० पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. ढोबळे सर म्हणून ते राज्याला परिचित आहेत. तब्बल ३ दशकांचा त्यांचा राजकिय आणि सामाजिक अनुभव आहे. निवडणूकी अगोदर मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास त्यांना संधी द्यावी असे जाणकारांचा मतप्रवाह आहे.
वंचित आघाडीने लोकसभा निवडणूकी केलेला धमाका थांबणे, त्याची धार कमी करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आघाडी करणारच. यामध्ये चंद्रकांत हांडोरे महत्वाची भुमिका बजावु शकतात.
लोकसभा निवडणूक ही बऱ्यापैकी जाती धर्मावर लढली गेली. आता विधानसभा पण त्याच वळणार जाणार असे दिसत आहे. त्याच धर्तीवर रणनीती आखण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपने हांडोरे आणि ढोबळेंना संधी द्यावी असा मतप्रवाह वाढत आहे.

error: Content is protected !!