तिसंगी ग्रामपंचायतीमध्ये परिचारक गटावर दिपक चंदनशिवेंचा “सर्जिकल स्ट्राईक”.

परिचारक गड केला उध्वस्त .
सरपंच दिपक चंदनशिवे व उपसरपंच सिंधुताई आंबुले यांची निवड झाली.

तिसंगी:- तिसंगी ता पंढरपूर येथिल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दीपक चंदनशिवे तर उपसरपंच पदी सिंधूबाई भारत आंबुले निवड करण्यात झाली आहे. अत्यंत नाट्यमय घडामोडी नंतर आरपीआयचे दिपक चंदनशिवेंनी परिचारक गटावर सर्जिकल स्ट्राईक केला. गेली अनेक वर्ष हुलकावणी देणारे पद दिपक चंदनशिवेंनी सरपंच पदाचा गड सर केला. निवडीच्या वेळी परिचारक गटाच्या कार्यकर्त्यानी गोंधल घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
तिसंगी (ता पंढरपूर) ग्रामपंचायतीवर परीचारक गटाचे वरचस्व होते.परिचारक-काळे गटाचे आठ सदस्य,काळे-भालके गटाचे तीन सदस्य निवडून आले होते,विद्यमान सरपंच व उपसरपंच परिचारक गटाचे होते.राजीनामा सत्र सुरू झाले पासुन सरपंच निवडीसाठी वेगळेच राजकारण सुरू झाले.परिचारक गटातील तीन सदस्य काळे-भालके गटास मिळून परिचारक गटाला मोठा सुरुंग लावला आहे.परिचारक गटाला मोठा हदरा दिला.विद्यमान सरपंच दीपक चंदनशिवे,उपसरपंच सिंधुबाई आंबुले,भालके गटाचे सदस्य गोरख पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटाचे सदस्य सुधाकर महानवर,विद्यमान परिचारक गटाचे भालके गटास मिळालेले सौ कारंडे,वैजयता रणदीवे आदीनी मिळून सरपंच,उपसरपंच पदाची निवड केली.

तसेच पोलिस बंदोबस्तात निवड करण्यात आली. सरपंच उपसरपंच निवड हि पोलिस बंदोबस्त करण्यात आली यावेळी पोलिस निरिक्षक किरण अवचर व दंगा काबू पंथक तैनात करण्यात आले.सदस्य घटना स्थळी येताच विरोधी परिचारक गटातील कार्यकर्त्यांनी पोलिस गाडी व सदस्याची गाडी आडविण्यात आली.यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिस यंत्रनेला बळाचा वापर करावा लागला. पोलिस यंत्रनेने जवळ-जवळ ५०० मिटर अंतरावर जमा बंदी केली.
तसेच यावेळी यशाचे शिलेदार माजी सरपंच हेमंतकुमार, सुधाकर महानवर, पाटील,माणिकराव लोखंडे, प्रकाश आप्पा पाटील, बाळासाहेब आहेरकर,सुभाष कारंडे,बालाजी पाटील,शाहजी पाटील,भिवा पाटील, मधुकर शेळके, नागनाथ मदने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!