मंगळवेढ्यात पाणी पेटले.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी शैला गोडसे यांचे आंदोलन

मंगळवेढा:- तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी व बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यासाठी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सोमवार दिनांक ३ जूनपासून या आंदोलनास सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून शैला गोडसे या आ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून विविध पातळीवर पाठपुरावा केला आहे. परंतु प्रशासनाकडून म्हणावी तशी कार्यवाही होताना दिसत नाही. म्हणूनच या योजनेवर आवाज उठविण्यासाठी शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान उजनी कालवा वि. क्र.9 चे उपकार्यकारी अभियंता मनोज पंडित यांनी सदर आंदोलनाला भेट दिली. प्रशासनाच्या आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. पण सक्षम अधिकाऱ्याने ठोस लेख आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय शिवसैनिक व शेतकऱ्यांनी घेतला.
मंगळवेढ्या पाणी प्रश्नावर आमदार भारत भालके , आमदार प्रशांत परिचारक , समाधान आवताडे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई कायमच सुरु असते. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसेंनी उडी घेतलीय. त्यांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्या बरोबरच आंदोलनाचा धडाका सुरु ठेवलाय.
राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, मल्हार महासंघ तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, लोहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बंडू लोहार या आंदोलनस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला. यावे शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, शहर प्रमुख सुनील दत्त, रामा गरंडे, तुकाराम गरंडे, उपतालुकाप्रमुख संभाजी खापे, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता कळकुंबे, उपशहर प्रमुख आप्पासाहेब शिर्के, अंबादास शिंदे, विजय सलगर, उमेश क्षीरसागर, दत्ता बंडगर, महिला आघाडी तालुका समन्वयक सुशीला सलगर, आरती बसवंती, शारदा जावळे, अर्चना भालेराव यांचेसह अनेक शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

नंदेश्वर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली. व आंदोलन स्थगित करण्याची आंदोलकांना विनंती केली असता ठोस लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा आंदोलकांनी निर्णय घेता. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार आहोत.
मनोज पंडित
उपकार्यकारी अभियंता
उजनी कालवा वि. क्र. 9 मंगळवेढा

वर्षानुवर्षे या भागातील शेतकरी पाणी मिळणार या आशेने बसले आहेत. पण या भागातील शेतकऱ्यांच्या पदरी आजपर्यंत निराशाच आली आहे. त्यामुळेच आम्ही या भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. सक्षम अधिकाऱ्याकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही.
शैला गोडसे
जि. प. सदस्या

error: Content is protected !!