पंढरपूर मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याचे प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे काळुंखेंना आदेश.

शिवाजी काळुंगेच्या भूमीकेकडे लक्ष.
पंढरपूर :- राज्यात कॉंग्रेस आघाडी इंच इंच जागेवर महायुतीच्या विरोधात लढत असताना पंढरपूरच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पंढरपूर मधून कॉंग्रेसने शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान पक्षाने आदेश दिला असला तरी काळुंगेंचा मोबाईल मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने हे नाट्य इतक्यात संपणारे नसल्याचे चित्र दिसत आहे.
शहर मध्य मधून राष्ट्रवादीचे उमेदवार जुबेर बागवान यांनी पक्षादेश मानत कॉंग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधातील उमेदवारी अर्ज काढून घेतला आहे.

आमदार भालके हे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने कॉंग्रेसने या मतदारसंघावर हक्क सांगत काळुंखेंना उमेदवारी दिली होती. यामध्ये अंर्तगत राजकारण ही होते. कॉंग्रेसचे आमदार असताना भालकेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कॉंग्रेस घराघरात पोहचवली होती. कॉंग्रेसच्या उमेदवारीने भालकेंना मोठी अडचण निर्माण झाली होती. ही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुत्र हलविण्यात आली.
प्रदेश कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले असले तरी काळुंगे यांचा मोबाईल बंद असून त्यांचा संपर्क होत नसल्याने भालके समर्थकांची धाक धुक कमी झाली नाही.

error: Content is protected !!