महायुतीचे उमेदवार परिचारकांना पाठिंब्यासाठी मोहिते पाटील गटाची बैठक.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुधाकरपंत परिचारकांसह आमदार प्रशांत परिचारक , रणजितसिंहांची प्रमुख उपस्थिती.
पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा सभा मतदारसंघात प्रचाराने जोर धरला आहे. चौरंगी लढत दिसत असली तरी प्रमुख लढत ही भालके, परिचारक अशी होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठिंबा देण्यासाठी आज बुधवारी अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर मंगळवेढ्याच्या मोहिते गटाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल शहा, दिपक वाडदेकर आदी उपस्थित होते.
या निवडणूकीत विजयी गुलाल उधळायचाच या इराद्याने परिचारक गट मैदानात उतरला आहे. मोहिते पाटील गटाची साथ मिळाल्याने परिचारकांची ताकत वाढली आहे. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची सुचना करण्यासाठी आणि प्रचाराची रणनीती आखण्यासाठी खुद्द विजयसिंह मोहिते पाटलांनी ही बैठक बोलवली होती. विजय दादांनी बैठकीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना केल्या.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगळवेढा तालुक्यात मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे.

error: Content is protected !!