गुरुवारी मंगळवेढ्यात धडाडणार प्रचाराच्या तोफा.

महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री फडणवीस तर राष्ट्रवादीसाठी खासदार कोल्हे.
पंढरपूर :- पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराने वेग घेतला आहे. गेली चार दिवस वैद्यकीय प्रचारावर भर दिलेल्या उमेदवारांसाठी नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार भारत भालकेंच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा गुरुवारी मंगळवेढ्यात होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पंढरपूर रोड वरील शासकीय विश्रामगृहा जवळ गुरुवार सकाळी ११ वाजता होणार आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांची सभा आठवडा बाजार मैदान येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.
पंढरपूर विधानसभेचे राजकीय गणित हे मंगळवेढ्याच्या मतदारांवर अवलंबून आहे. मंगळवेढ्याच्या ३५ गावच्या पाण्याचा प्रश्न आणि एम आय डी सीचा विकास हे कळीचा मुद्दे आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याकडे मंगळवेढेकरांचे लक्ष लागले आहे. तर खासदार कोल्हे काय बोलणार याचीही उत्सुकता मतदारांना लागली आहे.

error: Content is protected !!