चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला . टेंभुर्णी नजिकची घटना.

जनतेबरोबर पोलिस ही झाले असुरक्षित.

सोलापूर – अहमदनगर मार्गावर टेभुर्णी नजिक शेलगाव भाळवणी शिवारात पाच दरोडेखोरांनी ट्रक अडवुन लुटण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये करमाळा पोलिसांनी यातील एका आरोपीला पकडले. याप्रसंगी एका दरोडेखोराने पोलिसांवरच चाकूने हल्‍ला केला यामध्ये एक पोलिस जखमी झाला आहे.

याबाबत महेश संजय माने या पोलिस कर्मचा-याने करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत करमाळा पोलिसानी एका अल्पवयीन गुन्हेगारास पाठलाग करून पकडले असुन, त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ( एम एच 45/ यु-5922) ही जप्त केली आहे. यावेळी इराणसाहेब आपरिशा भोसले ,धर्मेद्र ऊर्फ गंड्या आपरिशा भोसले ,अभिजित अपरिषा भोसले, येडंग्या ऊर्फ छकुल्या आपरिशा भोसले सर्व रा.शेलगाव वांगी तालुका करमाळा अशी संशयीत आरोपींची नावे असून, हे चौघे यावेळी पळून जाण्यात यशस्‍वी झाले आहेत.
जिल्ह्यात पोलिसचं सुरक्षित नसल्याची भावना जनतेतुन व्यक्त होत आहे. मंगळवेढा,मोहोळ आणि आता टेंभुर्णी मध्ये दरोडेखोरांनी धुडगूस घातला आहे. मोहोळ आणि टेंभुर्णी मध्ये पोलिसांवरचं जीवघेणा हल्ला केला आहे. आता जिल्ह्यातील “जनतेचे” आणि “पोलिसंचे” रक्षण “प्रभू” करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − seven =

error: Content is protected !!