शाळेत धर्मग्रंथाचे वाचन करण्याऐवजी दररोज संविधान वाचन करा. आंबेडकरी संघटनांची मागणी

पंढरपूर :- देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्य घटनेने देशातील जनतेला आपले मूलभूत अधिकार दिले. जाती-धर्मांमध्ये विभागलेला देश संविधानामुळे एकसंघ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वभौम घटना दिली. समता- स्वातंत्र्य आणि बंधुता ही मुलतत्वे संविधानाने दिली. आज मात्र शाळा , महाविद्यालयात संविधानाचे शिक्षण देण्याऐवजी धर्मग्रंथाचे वाचन घेतले जाते. भविष्यात देशाला एकसंघ ठेवण्यासाठी संविधानाचे शिक्षण देण्यात यावे. संविधानाच्या प्रस्ताविकेचे दररोज वाचन घ्यावे अशी मागणी आंबेडकरी संघटनांच्या वतीने आज करण्यात आली.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. शहर आरपीआयच्या वतीने संविधान सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ही मागणी केली.
तसेच पंढरपूर मध्ये यावर्षी पासून प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचे कथन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम देश पातळीवर घेण्यात यावा अशी मागणी देखिल करण्यात आली.
याप्रसंगी आरपीआय चे नेते सुनिल सर्वगोड, बाळासाहेब कसबे , जितेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष संतोष पवार , तालुकाध्यक्ष अर्जुन मागाडे , युवक अध्यक्ष संतोष सर्वगोड , युवक राज्य उपाध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड , सुनिल वाघमारे , अमित कसबे , संतोष बंडगर यांच्यासह अनेक भीम अनुयायी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

7 comments

  1. Excellent weblog here! Additionally your website lots up fast! What web host are you the usage of? Can I get your associate link on your host? I desire my website loaded up as quickly as yours lol

  2. you are truly a good webmaster. The site loading velocity is incredible. It sort of feels that you are doing any unique trick. Moreover, The contents are masterpiece. you’ve performed a magnificent process in this matter!

  3. Wow! This can be one particular of the most helpful blogs We have ever arrive across on this subject. Basically Excellent. I’m also an expert in this topic so I can understand your effort.

  4. I would like to thank you for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade website post from you in the upcoming also. Actually your creative writing skills has encouraged me to get my own web site now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a great example of it.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − 6 =

error: Content is protected !!