वीज तोडल्याच्या रागातून जमावाची वीज वितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण.

एकजण गंभीर जखमी .

पंढरपूर :- माढा तालुक्यातील उपळाई गावात शेतातील वीज तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या जमावाने वीज कार्यालयात जावून दोन अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी तसेच सळईने मारहाण केल्याची प्रार्थमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रेम चव्हाण हे गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूरला हलवल्याचे समजते . या जमावात गावचे सरपंच मनोज गायकवाड यांचा देखिल समावेश असल्याची माहिती सोलापूर डेलीच्या हाती लागली आहे. जमाव घेवून आलेल्या आठ जणांनी मारहाण केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − five =

error: Content is protected !!