संदीप पवार हत्या प्रकरण. पंढरपूर मधून तिघांना अटक . आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

आरोपींना २६ मार्च पर्यंत पोलिस कोठडी.

पंढरपूर :- नगरसेवक संदीप पवार यांची रविवारी १८ मार्च रोजी गोळ्या घालून आणि कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली होती. सोमवारी ठाणे पोलिसांनी चार आरोपींना अटक केले आहे. आज गुरुवारी पंढरपूर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी आपल्या खुलाशात धक्कादायक माहिती दिली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या मध्ये आकाश हनुमंत बुराडे , लल्ल्या उर्फ रुपेश दशरथ सुरवसे ( दोघे रा. गवंडी गल्ली पंढरपूर) , सचिन भगवान वाघमारे ( रा. कासेगाव ता. पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कसून चौकशीअंती गुरुवारी दुपारी १२:५० वाजता या तिघांना अटक केले आहे. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.
हे तीनही आरोपी मयत संदीप पवार यांच्या घराच्या शेजारीचं राहतात. संदीप पवार यांनी आम्हाला नाहक त्रास देवुन अन्याय अत्याचार केल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांनी आपल्या कबुलीनाम्यात दिल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.
या तीन आरोपी मयत संदीप पवार यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. संदीप पवार यांची दिनचर्या कशी असते? ते कधी बाहेर पडतात? कुठे जातात? कुठे बसतात याची माहिती ह्या तिघांनी मुख्य आरोपींना पुरवल्याचे समजते. घटने दिवशी देखिल मयत संदीप पवार यांची संपूर्ण माहिती या तिघांनी पुरवल्याचा संशय आहे .
या तिनही आरोपींना आज पंढरपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.
अन्यायगृस्त आणि त्रासलेले घटक एकत्र येवून त्यांनी हे हत्याकांड घडवल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − nine =

error: Content is protected !!