वारकरी साहित्य परिषद करणार पंढरपूरची मोफत स्वच्छता.

वर्षाला ७० ते ७५ लाख रुपये खर्च .

पंढरपूर:- वारकरी साहित्य परिषद पंढरपूर सह राज्यातील सर्व तिर्थक्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. धुळमुक्त , कचरामुक्त , कचराकुंडी मुक्त , थुंकीमुक्त तिर्थक्षेत्र करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूर शहरात मागील काही दिवसांपासून ह्या कामाला सुरवात झाली आहे.दिवसातील १६ तास तीन पाळ्यांमध्ये ७० कामगार मंदिर परिसर , प्रदक्षणा मार्ग , नदीच्या घाटांची स्वच्छता करित आहेत. याचा वार्षिक खर्च ७० ते ७५ लाख रुपये आहे. सामाजिक संस्था , दानशूर व्यक्ती या कामासाठी आर्थिक सहकार्य करित असल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यातील शिर्डी, तुळजापूर, आळंदी , देहू, पैठण,शेगाव , गाणगापूर, जेजुरी या ठिकाणी देखिल लवकरच ही मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी सांप्रदायातील सर्व महाराज मंडळींना साहित्य परिषदेने स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक भाविक हा पंढरपूरला आल्यानंतर आपली स्व:ताची स्वच्छता स्वतः करेल असा संदेश दिला जाणार आहे. धार्मिक क्षेत्रातुन एखादा संदेश गेल्यास तो जनमानसात रुचतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंढरपूर नगरपालिका वर्षाला कोट्यवधी रुपये स्वच्छतेच्या नावाखाली खर्च करते. तरीही धुळमुक्त पंढरपूर झाले नाही. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अंदाजे १ कोटी ५० लाख रुपयांचे स्वच्छतेचे टेंडर काढले आहे. तर वारकरी साहित्य परिषद मोफत स्वच्छता करित आहे. त्यामुळे किमान मंदिर समितीने आपले टेंडर रद्द करुन वारकरी साहित्य परिषदेला नाममात्र दराने द्यावी अशी मागणी आता होत आहे.
यातून वाचणाऱ्या पैशातुन भाविकांसाठी इतर सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आल्यास भाविकांच्या सुविधांमध्ये भर पडणार आहे.

12 comments

 1. Hi there, just became aware of your blog through Google, and found that it is truly informative. I’m gonna watch out for brussels. I’ll be grateful if you continue this in future. Lots of people will be benefited from your writing. Cheers!

 2. Ankara Escort – Ankara Escort Bayan
  itechankara.com
  Ankara’nın en kaliteli escort bayanlarını sitemizde dolaşarak bulabilirsiniz.
  INOVUR
  https://itechankara.com › …
  Bu sayfanın çevirisini yap
  Инновационные продукты для вас и вашей семьи, Канцерогены в еде, Измерители нитратов и радиации.

 3. Hiya, I’m really glad I’ve found this info. Today bloggers publish only about gossips and internet and this is actually frustrating. A good website with interesting content, this is what I need. Thank you for keeping this web site, I’ll be visiting it. Do you do newsletters? Cant find it.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 6 =

error: Content is protected !!