संदीप पवार हत्याकांडातील मुख्य आरोपी अक्षय सुरवसे पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात.

रविवारी करणार पंढरपूर न्यायालयात हजर.

पंढरपूर:- नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसेसह चौघांना ठाणे पोलिसांनी १९ मार्चला अटक केली होती. आज शनिवारी या आरोपींचा कायदेशीर ताबा पंढरपूर पोलिसांना मिळाला आहे. रविवार २५ मार्च रोजी यांना पंढरपूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. ठाणे गुंह्यातील पोलिस कोठडी ब्रेक करुन पंढरपूरला आणण्यामध्ये पंढरपूर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे आता या हत्येचे गुढ उलगडणार आहे.
१८ मार्च गुडीपाडव्याच्या दिवशी दुपारी शहरातील हॉटेल श्रीराम मध्ये नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी मयत संदीप पवार यांच्या आई नगरसेविका सुरेखा पवार यांनी फिर्याद दाखल केली होती. यामध्ये अक्षय सुरवसे , संदीप अधटराव आणि विकी मोरे सह ६ ते ७ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
हत्येच्या दुसऱ्या दिवशी ठाणे खंडणी विरोधी पथकाने यातील मुख्य संशयित अक्षय सुरवसे , पुंडलिक वनारे , मनोज शिरशीकर आणि भक्तराज धुमाळ यांना दरोड्याच्या तयारीत असताना अटक केली होती. यावेळी झालेल्या झटापटीत संदीप अधटराव आणि विकी मोरे अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते.
ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या दरोड्याच्या तयारीत असल्या प्रकरणीच्या गुंह्यात या ४ आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पंढरपूर पोलिसांनी ठाणे न्यायालयात अर्ज करुन या आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या ९ आरोपींकडून आता हत्येचा कटाचा पुर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे .
दरम्यान शनिवारी न्यायालयात उभे केलेल्या प्रथमेश लोंढे ला २६ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ९ आरोपींना अटक झाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करित आहेत.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published.

nine − 8 =

error: Content is protected !!