भीमा कालवा मंडळाचा अधिक्षक अभियंता लाच स्विकारताना सापडला.

राहत्या घरी लाचलुचपत विभागाची कारवाई.

सोलापूर:- भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे आणि चालक कैलास सोमा आवचारे यांना 80 हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आज, मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कांबळे यांच्या घरी कोणार्क नगर विजापूर रोड येथे ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे ठेकेदार आहेत. २००९-१० मध्ये एकरुक उपसा सिंचनचे मातीकाम केले होते. त्याची अनामत रक्कम १४ लाख १६ हजार ६६५ रुपये काढण्यासाठी कांबळे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली. यातील १ लाख २० हजार रुपये पहिल्यांदा घेतले आहे. उर्वरित ८० हजार स्विकारताना ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय आल्याने कांबळे यांनी स्विकारलेले पैसे आवचारेने पळून जावून फेकून देण्याचा प्रयत्न केला. कांबळे आणि आवचारे यांना अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक मारकड यांनी ही कारवाई केली.

8 comments

 1. I just could not depart your website before suggesting that I extremely enjoyed the standard info a person provide for your visitors? Is going to be back often to check up on new posts

 2. Ankara Escort – Ankara Escort Bayan
  itechankara.com
  Ankara’nın en kaliteli escort bayanlarını sitemizde dolaşarak bulabilirsiniz.
  INOVUR
  https://itechankara.com › …
  Bu sayfanın çevirisini yap
  Инновационные продукты для вас и вашей семьи, Канцерогены в еде, Измерители нитратов и радиации.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 4 =

error: Content is protected !!