क्रांतीबा ज्योतीबा फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात श्रेयवाद उफाळला .

नेत्यांची धुनी धुण्याचा नादात कार्यक्रमाचा विसर .

पंढरपूर:- पंढरपूर शहर आणि तालुक्यात सध्या नेत्यांची धुनी धुण्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतला आहे . कार्यक्रम कोणताही असो “माझ्या नेत्याने हे केले” “माझ्या नेत्याने ते केले” यावरून श्रेयवाद सुरु केला जातो . आज ११ एप्रिल क्रांतीबा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात पुन्हा हाच प्रत्यय आला . भाजप गटनेते अनिल अभंगराव सरांनी महात्मा फुलेंच्या पुतळा सुशोभिकरणासाठी आम्ही प्रयत्न केले असे सांगून जयंतीच्या कार्यक्रमातच श्रेयवादाची लढाई सुरु केली.
नगरपालिकेचे भाजप गटनेते म्हणून अनिल अभंगराव सर बोलण्यास उभे राहिले . आज जो महात्मा फुलेंच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण दिसत आहे ते परिचारक गटामुळे आहे असा युक्तीवाद केला. आमच्या अडीज वर्षाच्या कार्यकाळात हा विकास दिसत असल्याचे सांगत त्यांनी परिचारकांच्या पदरी आपली निष्ठा दाखवली . यावर गप्प बसतील ते विरोधक कसले, लगेच पाठीमागून नगरसेवक महादेव भालेराव यांनी अभंगराव सरांना आठवण करुन देत आमदार भारत भालके यांनी हा पुतळा दिला आहे . आणि तात्कालीन नगराध्यक्षा उज्वला भालेराव यांच्या कार्यकाळात ह्या पुतळ्याचे काम झाल्याचे स्पष्ट केले . महामानवाच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांची शिदोरी समाजाला द्यायची असते , त्या महापुरुषांचे विचार जगाला सांगायचे असताना नेते मात्र आपल्या वरिष्ठांच्या खाललेल्या मिठाला जागण्यासाठी अशा कार्यक्रमांचा वापर करित आहेत .
महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या लक्षात आले. आपल्या भाषणात त्यांनी आमदार भालकेंनी पुतळा दिला हे मान्य आहे . श्रेयवादावर आपली शक्ती खर्च न करता या महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचा सल्ला त्यांनी दिला . आणि या विषयावर पडदा पाडला .

सुशोभीकरणाचा प्रस्ताव अद्याप दिलाचं नाही .
भाजप गटनेते अनिल अभंगराव यांनी आमच्या परिचारक आघाडीने पुतळा परिसराचे सुशोभीकरण केल्याच्या बाता मारल्या . पण असा कोणताचं प्रस्ताव अद्याप नगरपालिकेकडे आला नाही असे संयोजकांनीच जाहीर केले . त्यामुळे नगरसेवकअनिल अभंगराव चांगलेच उघडे पडल्याचे दिसून आले .

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × two =

error: Content is protected !!