वाळू चोरीतील वाहने सोडणाऱ्या “तहसिल” मधिल साखळीचा “चालक” कोण ?

दिवसाढवळ्या सोडली जातात वाहनं .

पंढरपूर:- भीमा नदीच्या पात्रात वाळू तस्करांनी धिंगाणा घातला आहे . भीमेच्या पात्राची राखरांगोळी करुन टाकली आहे . कारवाई करण्यास गेलेल्या महसूल प्रशासन असो की पोलिस यांच्यावर हल्ला करण्यास ही हे वाळू तस्कर घाबरत नाहीत . अशा परिस्थितीत मात्र जप्त केलेली, कारवाई केलेली वाळूची वाहनं शासकीय गोदामातून परस्पर सोडली जात आहेत. यासाठी “तहसिल” कार्यालयात एक साखळी कार्यरत आहे . मात्र या साखळीचा “चालक” कोण ? यावर तर्क वितर्क सुरु झाले आहेत.
गेल्या १५ दिवसांमध्ये कारवाई केलेली ३ वाहने परस्पर सोडली आहेत . त्यापैकी १ वाहन काही जागरूक नागरिकांनी पुन्हा तहसिलच्या ताब्यात दिले आहे . मात्र या प्रकरणाची चौकशी केली असता हा ट्रॅक्टर ( mh-13 aj-1705 ) हा वाळू वाहतूक करताना भटुंबरे गावात सापडला होता. यावर कागदोपत्री कोणतीही कारवाई न करता शासकीय गोदामात ठेवला होता. १० एप्रिल रोजी हा ट्रॅक्टर सोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फसला . ट्रॅक्टरचा मालक महसूल अधिकाऱ्यांच्या समक्ष पळून गेला की आपले बिंग फुटेल म्हणून त्याला पळवून लावले? हा सवाल आता विचारला जावू लागलाय.
जप्त केलेली वाळू , वाहने , वाहनांचे स्पेअर पार्ट याची चोरी शासकीय गोदामातुन केली जाते. याठिकाणी एक कोतवाल सुरक्षेसाठी नेमला आहे. तसेच गोडावुन किपर ची देखिल जबाबदारी आहे . मात्र यांच्या सुरक्षा कवचातून दिवसाढवळ्या ह्या चोऱ्या होताना दिवस आहेत. यावर तहसीलदार मधूसूदन बर्गे यांच्याकडे विचारणा केली असता, “चौकशी करतो” हे पुढाऱ्यांला किंव्हा मंत्र्याला शोभेल असे वाक्य बोलून ते मोकळे होतात.
ही वाहनं सोडण्यामध्ये तहसिल मध्ये एक मोठी साखळी काम करीत आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखिल सहभाग असल्याच्या चर्चा महसूल विभागत सुरु आहे.
या साखळीचा , टोळीचा “चालक” शोधणे गरजेचे आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर तहसीलदारांच्या “चौकशीला” काहीचं “अर्थ” राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − 15 =

error: Content is protected !!