अल्पवयीन मुलगी गरोदर . गुन्हा दाखल केल्यास अन्यायगृस्त कुटुंबास जीवे मारण्याची धमकी.

ग्रामीण भागातील प्रकार .

पंढरपूर:- प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुली सोबत शाररीक संबंध आल्याने “ती” मुलगी गरोदर आहे. पोलिसात गुन्हा दाखल केल्यास “त्या” कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरापासून जवळचं असलेल्या देवाच्या गावात घडली आहे.
पंढरपूर शहरातील एका तथाकथित नेत्याच्या मुलाने हे गंभीर कृत्य केले आहे. या नेत्याची एक शिक्षण संस्था देखिल असल्याची माहिती पुढे येत आहे.
याबद्दल सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील या नेत्याच्या मुलाचे “त्या” मुलीसोबत प्रेम संबंध असल्याचे बोलले जात आहे. मुलगी अल्पवयीन असताना या मुलाले तिच्यासोबत शाररीक संबंध ठेवले. ही बाब मुलाच्या घरच्यांना माहिती होती. तरी देखिल फुशारकी मारण्यात आणि बडेजावपणा करण्यात तरबेज असलेल्या या नेत्याने मुलाला वेळीच वेसण घातले नाही. या दोघांचे ऐकमेकांच्या घरी येणे जाणे असल्याचे सांगितले जात आहे.
बापाच्या जीवावर मुलाने “त्या” मुलीस आता गरोदर केले आहे. ही बाब मुलीच्या आईला कळाल्यावर तिने आक्षेप घेतला आणि पोलिसात जाण्याची धमकी दिली. सांगली जिल्ह्यातून सुरु झालेला हा पोलिस तक्रारीचा मुद्दा पंढरपूर शहर पोलिसांकडून तालुका पोलिसात गेला. त्यावेळी त्या नेत्याने पोलिसांपासून सत्य परिस्थिती लपवून ठेवली. आमचे आपापसातले प्रकरण आहे . मुलगाला समजत देतो परत त्या मुलीला त्रास देणार नाही असे लिहून दिले . मुलगी ४ महिन्यांची गरोदर असल्याचे लपवून ठेवले.
आता तो नेता “त्या” मुलीच्या कुटुंबाला पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे समजते. सध्या ती माता आपल्या गरोदर मुलीला शहरातील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी घेवून फिरत आहे . मात्र तो बेकायदेशीर उपचार करण्यास कोणी तयार नसल्याने त्या मातेची आणि मुलीची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
पोलिसांनी “त्या” मुलीला आणि तिच्या कुटुंबाला विश्वासात घेवून गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्या भयभीत कुटुंबाला न्याय देण्यात पोलिस “पास” होतात की “नापास” हे पहावे लागणार आहे.

7 comments

  1. I’m very happy to read this. This is the type of manual that needs to be given and not the random misinformation that is at the other blogs. Appreciate your sharing this greatest doc.

  2. I like the valuable info you provide in your articles. I’ll bookmark your blog and check again here frequently. I am quite sure I’ll learn many new stuff right here! Good luck for the next!

  3. Simply want to say your article is as surprising. The clarity in your post is just cool and i could assume you are an expert on this subject. Well with your permission allow me to grab your RSS feed to keep up to date with forthcoming post. Thanks a million and please keep up the enjoyable work.

  4. Its like you read my mind! You appear to know so much about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with some pics to drive the message home a little bit, but other than that, this is fantastic blog. A great read. I’ll certainly be back.

  5. You can certainly see your skills within the work you write. The sector hopes for even more passionate writers such as you who are not afraid to say how they believe. All the time follow your heart.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × four =

error: Content is protected !!