Home पंढरपूर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; माढा न्यायालयातील रिक्त पदांना दिली राज्य सरकारने...

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; माढा न्यायालयातील रिक्त पदांना दिली राज्य सरकारने मंजुरी

528
0

नव्याने मंजूर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाकरीता पदांची निर्मिती

पंढरपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठव्यपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत माढा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाकरीता , दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) अधीक्षक, साह्यक अधिक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बेलिफ,गट ड कर्मचारी, अशा पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आ.मोहिते-पाटील यांनी पक्षकांराच्या सोयींसाठी माढा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मंजुर करून घेतले होते. परंतू कामकाज पार पाडण्याकरीता आवश्यक त्या पदांची निर्मिती झालेली नव्हती पद निर्मितीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागकडे प्रलंबित होता.

पदनिर्मिती अभावी नव्याने मंजूर झालेल्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे कामकाज होत नाही, पक्षकारांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून लवकरात लवकर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासाठी आवश्यक ते पदांची निर्मिती व या ठिकाणच्या चार न्यायाधीशांच्या निवासस्थान बांधण्यासाठी आर्थिक तरतुद व्हावी म्हणून आ.मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.