Home पंढरपूर श्री.विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा संपन्न ; श्री विठ्ठलाला 11 ब्रम्हवृदांकडून रूद्राचा अभिषेक व...

श्री.विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा संपन्न ; श्री विठ्ठलाला 11 ब्रम्हवृदांकडून रूद्राचा अभिषेक व श्री.रूक्मिणीमातेस 11 ब्रम्हवृंदाकडून पवमान अभिषेक करण्यात आला.

84
0

पंढरपूर :- प्रतीवर्षी प्रमाणे कार्तिकी यात्रा शुक्रवार दिनांक 04 नोव्हेंबर, 2022 रोजी संपन्न झाली. या यात्रेला भाविकांची गर्दी विचारात घेऊन, परंपरेनुसार चांगला महुर्त व दिवस पाहून दि.28/10/2022 रोजी श्रींचा पलंग काढून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद करून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधादक्षा हे राजोपचार सुरू करण्यात आले होते.
सदरचे राजोपचार पूर्ववत करण्यासाठी चांगला महुर्त व दिवस पाहून कार्तिक वद्य 5 रविवार, दि.13/11/2022 रोजी श्रींची विधिवत प्रक्षाळपुजा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री.विठ्ठलाकडे 11 ब्रम्हवृदांकडून रूद्राचा अभिषेक व श्री.रूक्मिणीमातेस 11 ब्रम्हवृंदाकडून पवमान अभिषेक करण्यात आला.

श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणीमातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मा. सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, मा.सदस्य श्री.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. त्यावेळी कार्यकारी अधिकारी श्री संजीव जाधव व व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान/पाणी घालण्यात आले. रात्री शेजारती नंतर देवाचा शिणवटा घालविण्यासाठी 17 वनस्पतीचा काढा दाखविण्यात येणार आहे.