Home पंढरपूर महिला हॉस्पिटलमध्ये गर्भपातासह कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना 25 वर्षीय महिलेचा मृत्यू.

महिला हॉस्पिटलमध्ये गर्भपातासह कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना 25 वर्षीय महिलेचा मृत्यू.

1583
0

पंढरपूर :- गर्भपातासह कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करीत असताना अश्‍विनी धनाजी इटकर  (वय 25 रा,लक्ष्मी दहिवडी ता.मंगळवेढा) या महिलेचा मृत्यू झाला असून याची पोलिसांत आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.

या घटनेची हकिकत अशी,दि. 19 जून रोजी यातील मयत अश्‍विनी धनाजी इटकर ही महिला गर्भपातासह मुल बंद होण्याची शस्त्रक्रिया करण्याकरीता मंगळवेढा येथील  दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.दुपारी 2.45 वा. शस्त्रक्रिया गृहात सदर महिलेला घेवून भूल दिल्यानंतर गर्भपात झाले. नंतर मुल बंद होण्याचे ऑपरेशन करण्यापुर्वी ती गंभीर झाली.या दरम्यान आवश्यक ते उपचार त्वरीत करण्यात आले.

यासाठी डॉ.विवेक निकम यांना पाचारण करण्यात आले.डॉ.निकम यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या आय.सी.यू.मध्ये जावे लागले. सर्व प्रयत्न करूनही अखेर सदर महिलेचा मृत्यू झाला. पुढील योग्य ती कार्यवाही व्हावी असे लेखी पत्र पोलिसांना प्राप्त झाल्याने आकस्मित मयत स्टेशन डायरीला नोंदविण्यात आली आहे.

या घटनेची खबर महिला हॉस्पिटलच्या डॉ.पुष्पांजली नंदकुमार शिंदे यांनी दिली आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय राऊत हे करीत आहेत.