Home पंढरपूर कर्मवीर औदुंबर आण्णानंतर ऊस बीलसाठी फिरतोय टांगा – कुणी सुरू केली...

कर्मवीर औदुंबर आण्णानंतर ऊस बीलसाठी फिरतोय टांगा – कुणी सुरू केली खंडित परंपरा वाचा सविस्तर

507
0

पंढरपूर तालुक्यातील विट्ठलच्या६४०० सभासदांना मिळणार हप्ता:- अमर पाटील

सांगोला कारखान्यांचा १००प्रमाणे दुसरा हप्त्याचे वाटप झाले सुरू,

पंढरपूर :- सांगोला तालुक्यातील असलेल्या धाराशिव साखर कारखाना युनिट नं४च्या मागील गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १००रुपये प्रमाणे दुसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती अमर पाटील यांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा चोख कारभार चालू होता. त्यावेळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाबाबत माहिती व्हावी म्हणून टांग्यावरून स्पीकर फिरविण्याची प्रथा होती. तीच प्रथा आता चोख कारभार करणारे धाराशिव साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू केली आहे.

या सांगोला साखर कारखान्यासाठी पंढरपूर भागातील विठ्ठलच्या तब्बल ६४०० सभासद यांचा उसाचा प्रश्न मिटवला होता. यामुळे आपल्या तालुक्यातील अनेक लोकांना ऊस बिल वाटप बाबत टांगा फिरवून पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर औदुंबरआण्णाच्या पावलावर पाऊल ठेऊन कारभार करू शकतो हे दाखवून दिले आहे.

१२वर्ष बंद अवस्थेत असलेला सांगोला कारखाना अवघ्या ३५ दिवसात सुरू करून तो स्वच्छता करून नीटनेटकं करून सुरू करून दाखविला. पहिल्याच हंगामात कोणतेही कारण आणि कोणावरती ही ठपका न ठेवता ऊस बिल असो अथवा कारखान्यातील कोणत्याही देण्याची ओरड येऊ न देण्याची भूमिका पार पडली आहे.

पहिल्याच हंगामात3लाख30हजार मे टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामधील पहिला हप्ता2000प्रमाणे अदा केला आहे. हा १००रुपये प्रमाणे दुसरा हप्त्याचे वाटप सुरू केले आहे. आगामी काळात भरीव हप्ता देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील यांनी सांगितले आहे.