Home पंढरपूर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दीर्घायुष्यासाठी विठ्ठलाला साकडे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दीर्घायुष्यासाठी विठ्ठलाला साकडे.

306
0

पंढरपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर कोरोनामुक्त होऊन घरी यावेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे असे साकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला आज विठ्ठल चरणी घातले.
अतिवृष्टी आणि महापूरामुळे राज्यातील हजारो हेक्टरवर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अजित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकर्यांना दिलासा दिला. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सौम्य लक्षणे असले तरी त्यांना सध्या उपचारा साठी रूग्णालयात दाखल केले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अजित पवार यांनीच सांगितले आहे. त्यानंतर आज पंढरपूर येथील शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे व त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पाषाण पुंश एकादशीचे औचित साधून संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाची पूजा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि भगिरथ भालके हे लवकर बरे व्हावेत.आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय व्हावेत असे विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले.
विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगिरथ भालके हे देखील कोरोना पाॅझिटिव्ह आले असून त्यांच्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, राष्ट्रवादी युवक शहरअध्यक्ष संदीप मांडवे , शहर संघटक विजय मोरे , सचिव सागर कवडे , सुमीत शिंदे,उपाध्यक्ष दादा थिटे, उपाध्यक्ष विशाल डोंगरे, रामचंद्र खडकेसह सर्व राष्ट्रवादी युवक चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.